माझं प्रेरणास्रोत आणि नवीन ओळख.
" अगं मम्मी तु काहीतरी कर ना गं स्वतःसाठी आणि तू करणार आहेस प्रॉमिस कर मला..."माझी लेक मृणाल 12वी नंतर पुढील शिक्षणासाठी हॉस्टेलवर जाण्याआधी मला सांगत होती. माझी लेक माझ्या मनाचा आरसा आहे . माझ्या मनात चाललेल्या भावनांच्या कल्लोळाला ती अगदी अचूक हेरत असते...❤
ती या जगात आली तेंव्हा तिचे बाबा माझ्यासोबत नव्हते ,ते INDIAN NAVY मध्ये कार्यरत असल्यामुळे तेंव्हा त्यांची पोस्टींग केरळ मध्ये होती...त्यानां सुट्टी न मिळाल्यामुळे ते येऊ शकले नव्हते...पण मला मनापासून वाटत होतं की आमच्या आयुष्यातील तो अनमोल क्षण जो आम्हाला आईबाबा म्हणून एक नवीन ओळख देणार होता त्या वेळी ते माझ्या सोबत असावेत पण...असो!!!त्यांचा ही नाईलाज होता...ती आली आणि मला नवीन ओळख मिळाली...आई💕💕💕
माझं पिलु या जगात आलं आणि माझं सारं जगच बदलुन गेलं...ती ज्या क्षणी माझ्या आयुष्यात आली अगदी त्या क्षणापासून आजपर्यंत आम्ही दोघी कधीच एकमेकींना सोडून राहिलो नाही...माझी सावली बनून नेहमी माझ्या अवती भोवती वावरायची...आणि आता ती होस्टेलवर रहायला जाणार होती...तिला माझी काळजी वाटत होती...तिच्या माझ्याजवळ नासण्याने मला त्रास होईल...तिच्या काळजीने माझ्या तब्येतीवर परिणाम होईल...मी रडत राहीन...म्हणून ती मला कुठेतरी मन गुंतवायला सांगत होती...❤
पण मी करणार काय...? कारण , आज पर्यंत माझी मुलं , माझा नवरा , माझं घर एवढंच माझं विश्व होत...घराच्या चार भिंतीतच माझं सारं जग सामावलेलं होतं...या सगळ्यापलीकडे जाऊन मी कधी विचारच केला नव्हता... पण आता करावा अस वाटत होतं...पण करायचं काय...? कशाचाच अनुभव पाठीशी नव्हता...ह्या सगळ्यात मी माझी वाचनाची आवड मात्र छान जोपासली होती ❤...हातात एखादा कागदाचा कपटा जरी पडला तरी त्याला उलथा पालथा करून नीट वाचल्याशिवाय तो कचऱ्यात जात नसायचा...
माझ्या मुलांना मी कधीच ट्युशन ला पाठवलेलं नव्हतं अगदी 10वी , 12वीला सुध्दा...त्यांचा अभ्यास मी घरीच घेत होते...मग चिलु नी सुचवलं , तु छान शिकवतेस ट्युशन्स घे...लाडाने मी माझ्या लेकीला चिलु म्हणते...मग मी ट्युशन घ्यायला सुरुवात केली...लोकांचा रिस्पॉन्स चांगला भेटू लागला...आणि आयुष्यात दुसरी स्वतःची अशी ओळख निर्माण झाली...टीचर 💕💕💕
वाचनाची आवड आधीपासूनच होती...माझी लेक जे काही लिहायची ती ते सगळ्यात आधी मला वाचायला द्यायची... माझी चिलु पण लिहते बर कां !!! पण तिचं प्रभुत्व हिंदी आणि ENGLISH वर...तिच्या लिखाणाची पहिली वाचक मी असायचे...तिचं लिखाण वाचता वाचता तिच्याच प्रेरणेने मी थोडं फार लिहू लागले. आणि सर्वात आधी माझ्या लिखाणाची सुरवात झाली ती #ईरा पासुन. मी लिहून #ईरा वर पोस्ट करू लागले. आणि प्रेमकथा या विषयावर स्पर्धेत माझी कथा पहिली आली. नंतर पण एक लेख लिहला आणि मॉम्सप्रेसो मराठी वर प्रकाशित केेला , आणि आश्चर्य माझा पहिलाच लेेेख #माझेलेेेखन या संकल्पने अतंर्गत निवडुन आला...नंतर #100शब्दाची गोष्ट पण निवडली गेली...इथं पण माझ्या लेकीनेच मला जिंकवल बरं का !!! विषय होता पुनर्जन्म झाला तर...आणि माझ्या गोष्टीच नाव होतंं...❤
माझी लेक मााझं प्रतिरूप💕💕
कधी कधी माझी लाडकी लेक लाडात आली की माझं पिल्लू , माझं शहाणं बाळ म्हणून मला मिठी मारते , आणि मी पण मग अलगद तिच्या कुशीत शिरते...मग लाडाने ती ही मला थोपटते , डोक्यावरून हात फिरवतेे , प्रेमाने कुरवाळते , आणि थोडया वेळापूरता सुरू होतो तिचा आईची आई बनण्याचा खेळ... मग मी पण उपभोगते तीच निर्मळ आईपण , आणि पुन्ह्यांदा जगते माझं बालपण...😊
आई आणि लेकीच्या या खेळात ती माझचं प्रतिबिंब असते , मनाच्या आरश्यात ती माझंच प्रतिरूप मला दाखवत असते...♥
पुनर्जन्म मिळाला तर आवडेल मला माझ्या लेकीची लेक बनुन तिच्या पोटी जन्म घेणं...तिच्या मायेच्या उबदार पंखाखाली स्वतःला घडवणं ❤
मनात एक विश्वास निर्माण झाला...आपण ही लिहू शकतो...आणि सुरू झाला माझा नवीन लेखन प्रवास ... मायलेकीच्या या प्रेमानं मला एक नवीन ओळख मिळवून दिली "लेखिका" म्हणून!!!…💕💕💕
अश्याप्रकारे जीवनाच्या अनेक टप्प्यावर , जीवनातल्या अनेक चढ उतारावर ती मला नेहमी एक ऊर्जा देऊन जाते ... जरुरी नाही आपण नेहमी मोठ्यांकडूनच काहीतरी शिकले पाहिजे या जगातील प्रत्येक लहानातील लहान गोष्ट आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते नवीन प्रेरणा देऊन जाते ...गरज आहे फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याचा...आणि अश्याप्रकारे माझी लेक मृणाल माझी प्रेरणास्रोत बनली...❤❤❤
मी इथे #ईरा , #मॉम्सप्रेसो आणि त्यांच्या पूर्ण टीम चे आभार मानू इच्छिते...त्यांनी आम्हा सारख्या नवोदितांना एक छान व्यासपीठ उपलब्ध करून दिले...मनःपूर्वक धन्यवाद#ईरा आणि momspresso marathi and team..…🙏😊💕💕.
©® सुनीता मधुकर पाटील.
Copy right
All right reserved.

Tags:
लेख