© मधुनिता
© सुनीता मधुकर पाटील
१०० शब्दांची कथा.
You are positive
नर्स स्नेहलला म्हणाली "you are positive" और तुम्हारा HIV टेस्ट," इतकं बोलून ती डॉक्टरांनी बोलवल्यामुळे त्यांच्या केबिन मध्ये गेली. "प्रेग्नन्सी टेस्टचे रिपोर्ट्स घ्यायला आलेल्या स्नेहलची हे ऐकुन कंबरच हबकली. इतक्यात मोहित तिथे आला, तिने मोहितला सगळं सांगितलं, तो ही अस्वस्थ झाला. असं कसं झालं.
दोघांनाही एकमेकांच्या चारित्र्यावर अजिबात संशय नव्हता. मग कुठे? सलुन, पार्लर की हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान इंजेक्शनमुळे.
दोघेही दहा मिनिटं तशीच स्तब्ध बसुन राहिली. शेवटी दोघेही नर्सकडे गेले आणि विचारलं" वो HIV टेस्ट पॉजिटीव्ह है, क्या करना पडेगा।"
नर्स बोलली "किसने बोला तुम HIV पॉजिटीव्ह है।" स्नेहल म्हणाली "अभी तो आपने बताया।" नर्सने डोक्यावर हात मारून घेतला.
"अय्यो !! मैने बोला तुम्हारा प्रेग्नन्सी टेस्ट पॉजिटिव्ह है, इसलिये बाकी टेस्ट के साथ HIV टेस्ट भी करना मांगता है। ऐसा कभी सोचना भी मत।"
मल्याळी नर्स, तिचं हिंदी, इंग्लिश मिक्स बोलणं आणि शब्दानां तो मल्याळी भाषेचा गंध यामुळे सगळा घोळ. पण त्या दहा मिनिटांमध्ये या दोघांनी नक्कीच मरण अनुभवलं होतं.
©️ सुनीता मधुकर पाटील
गैरसमज कधी कधी किती भयानक असतात ना. मरण अनुभवायला समोर यमराजच उभा असायला हवा असं जरुरी नाही. छोटे छोटे गैरसमज देखील कधी कधी मरणासन्न अवस्थेची अनुभूती करवतात.
Copyright
All rights reserved.
कथा आवडल्यास लेखकाच्या नावासहित शेअर करावी.
Tags:
१०० शब्दांची कथा.